वडिलांच्या मृत्यूमुळे त्यांचे नाव कमी करून तक्रारदाराच्या नावाची नोंद करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील तलाठय़ास अजून एकासह अटक करण्यात आली. बोदवड तालुक्यातील धोंडखेडा शिवारात तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर तक्रारदाराचे वडील व काका यांचे नाव वारस म्हणून होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे नाव कमी करून आपल्या नावाची नोंद करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. तलाठी धीरज दगडू ढेकणे यांनी त्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये कमी करण्यात आले. आठ हजार रुपये मनूर येथील गजानन शालिग्राम या व्यक्तीमार्फत स्वीकारत असताना धोंडखेडय़ाच्या तलाठी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली.

Story img Loader