करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला असून दैनंदिन रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्याही उच्चांक गाठत असून चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र अद्यापही अनेकजण आपण एकदम ठणठणीत असून करोना होणार नाही अशा गैरसमजात आहेत. तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर थांबा…कारण ही बातमी वाचून तुम्हीदेखील खडबडून जागे व्हाल. कारण मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं नुकतंच करोनामुळे निधन झालं आहे. तो ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीश लाडने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं करोनामुळे निधन

करोनाची लागण झाल्यानंत जगदीश लाड उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचं निधन झालं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.