एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीनंतर बार कौन्सिलने हा निर्णय दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “संजय शिरसाटांनी वापरलेली भाषा…”, सुषमा अंधारेंबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून रूपाली पाटलांची टीका

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप ॲड. सुशील मंचेकर यांनी केला होता. यासंदर्भातील तक्रार त्यांनी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलकडे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. पण या कारवाईविरोधात त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.

हेही वाचा – संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवण्याची शक्यता, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार दाखल; म्हणाल्या, “या विकृत आमदाराने…”

यासंदर्भात टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना अ‍ॅड. सुशील मंचरकर म्हणाले, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान वकीलांचा गणवेश आणि बॅंड घालून आझाद मैदानात जल्लोष केला होता. तसेच त्यानंतर झालेल्या बैठकीतही वकीलांचा गणवेश परिधान करून ते सहभागी झाले होते. त्यांच्या या कृतीमुळे वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन झालं. त्यामुळे यासंदर्भात मी बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. आज याबाबात बार कौन्सिलने निर्णय दिला असून त्यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court canceled advocate charter of gunaratna sadavarte for two years spb