राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती.

सचिन वाझे हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मन्सुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच जामीन दिला होता. परंतु, इतर दोन गुन्ह्यांत आरोपी असल्याने त्यांचा तुरुंगवास लांबला. मे महिन्यांत त्यांनी पुन्हा अर्ज करून जामीनाची मागणी केली होती. परंतु, तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.

बातमी अपडेट होत आहे.