रत्नागिरी : गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्याप्रकरणी टीआरपी येथील साई हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी हॉस्पिटलचे डॉक्टर अनंत नारायण शिगवण वांच्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा बेकायदेशीर प्रकार उघडकीस आल्यामुळे चौकशी करून जिल्हा आरोग्य विभागाने या हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी ही माहिती दिली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली. गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य रुग्णांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शुक्रवार २६ ऑगस्टला रात्री १० च्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी ग्रागीण पोलिस निरीक्षक नितीन येरे यांच्या पथकाला सोबत घेऊन साई हॉस्पिटलवर छापा टाकला. यावेळी सर्व हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व गर्भपात करण्यासाठी आवश्यक साहित्य आढळून आले, वैद्यकीय पथकासह ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून गोळ्या, साहित्य जप्त केल्या.

Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

आणखी वाचा-सिंधुदुर्ग : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्यांना वाचवायला गेले आणि स्वतःच अडकले

डॉ. भास्कर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी डॉ. अनंत शिगवण यांच्याविरुद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा केल्याप्रकरणी डॉ. शिगवण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉ. भास्कर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी डॉ. अनंत शिगवण यांच्याविरुद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा केल्याप्रकरणी डॉ. शिगवण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी केली. या हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द केला आहे.