शिवसेनाप्रमुखांचा अस्थिकलश धुळ्यात आणण्यात येणार असल्याची माहिती आ. प्रा. शरद पाटील यांनी दिली.
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, उपमहानगरप्रमुख हिलाल माळी यांच्यासह आ. पाटील मुंबईत गेले होते. ‘मातोश्री’वर पोहोचल्यानंतर आपण किती महान व्यक्तीच्या छात्रछायेखाली कार्यरत होतो, हे खऱ्या अर्थाने अनुभवयास मिळाल्याचे आ. पाटील यांनी नमूद केले. लाखो शिवसैनिकांची उपस्थिती किती शिस्तीने, आपुलकीने दहा ते बारा तास एका जागी शांत राहू शकते, याची प्रचीती आली. मुस्लीम बांधवांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी नास्ता व पाण्याची व्यवस्था केली होती. बाळासाहेबांवरील त्यांचा हा विश्वास अवर्णनीय होता. बाळासाहेबांचा अस्थिकलश धुळ्यात आणण्यात येणार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले.

Story img Loader