रायगड: मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह जुन्या मार्गांवरील बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे खालापूर टोल नाका ते अमृताजन ब्रिज तसेच खंडाळा लोणावळा एक्सिटपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मुंबई पुणे जुन्या मार्गांवरून बोरघाटात पुण्याकडे जाताना खोपोली ते खंडाळा पर्यंत १०-१२ किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा होत्या. विकएंड तसेच नाताळच्या सलग सुट्ट्यामुळे मुंबईतून बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने वाढ झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम होती.