नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे काम करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या मजुरांच्या घरात मालमोटार शिरल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज(रविवार) पहाटे जालना येथे घडली.

मालमोटार या कामगारांच्या पत्र्याच्या घरात शिरल्याने ही घटना घडली. जालना शहरापासून जवळ असलेल्या आंबेडकरवाडी परिसरातील महामार्गाच्या कामाजवळ झालेल्या या अपघातात धनिकराम छकू भूमिया(वय २२) आणि मुकेश गोरिलाल भूमिया(वय २२) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही मध्यप्रदेशमधील कटनी जिल्हयातील रहिवासी होते. या अपघातात अन्य चार मजूर देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader