Vidhan Parishad Election Result Ajit pawar Group : अटीतटीच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे २३ तर शिवाजीराव गर्जे हे २४ मते घेऊन विजयी झाले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडे ४२ आमदार असतानाही त्यांना ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे ही उर्वरित पाच मते कोणाची मिळाली असा प्रश्न निर्माण झाला आहे.

“काही पुढचे राऊंड झाले तरीही महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून येण्यास काही अडचण नाही. एकंदरीतच या निवडणुकीवर महाराष्ट्राचं लक्ष होतं. सातत्याने वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आमच्याकडेही ४२ मते होती. परंतु, त्यापेक्षा अधिक मतदारांनी आमदारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली. त्यासाठी सर्व आमदारांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला हे दोघेही विधीमंडळात काम करतील. पक्षाची आणि जनतेची भूमिका मांडून प्रश्न सोडवतील”, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निकाल स्पष्ट झाल्यानंतर (Vidhan Parishad Election Result ) दिली.

Gajendra Shekhawat criticized Mahavikas Aghadi government for increased corruption and halted projects
मविआ सरकारमुळे राज्याला आजही दुष्परिणाम भोगावे लागताहेत, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टिका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
Arguments over performance of MLA Prashant Thakur during this period
ठाकूरांच्या कामगिरीवरून वाद;पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचे मुद्दे ऐरणीवर
maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
shweta mahale vs congress rahul bondre
चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

हेही वाचा >> विधान परिषद निवडणूक निकाल : पंकजा मुंडेंसह भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय

“पुढचे राऊंड झाले तरीही महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून येण्यास काही अडचण नाही. एकंदरीतच या निवडणुकीवर महाराष्ट्राचं लक्ष होतं. सातत्याने वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आमच्याकडेही ४२ मते होती. परंतु, त्यापेक्षा अधिक मतदारांनी आमदारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली. त्यासाठी सर्व आमदारांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला हे दोघेही विधीमंडळात काम करतील. पक्षाची आणि जनतेची भूमिका मांडून प्रश्न सोडवतील”, असं अजित पवार म्हणाले.

“महायुतीची एक युनिटी यातून महाराष्ट्राला पाहायाला मिळाली. इथून पुढेही विधानसभेच्या निवडणुकीत अशाच पद्धतीची एकी ठेवून महायुतीचं सरकार आपल्या राज्यात निवडून आणण्याकरता परिश्रम करू. महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलंय त्या सर्वांचे आभार मानतो आणि निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं, पण एक अधिक उमेदवार आला आणि एक वेगळा रंग चढला, आता निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आहे. खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेत निवडून गेले आहेत”, असंही ते पुढे म्हणाले.

“कोणतेही वेडवाकडे प्रकार घडू न देता अतिशय लोकशाही पद्धतीने ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न महायुतीने केला, याचं मनापासून समाधान मला आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीला मिळाली ४७ मते

“आमच्याकडे एकूण ४२ मतदार होते. परंतु आम्हाला ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे आम्हाला पाच मतदार जास्त मिळाले. पाच अधिक मतदारांनी पाठिंबा दिला आहे. निवडणूक असतात तेव्हा आरोपही होतात. पण आपण आरोपांकडे लक्ष द्यायचं नसतं, आपण फक्त विकासाकडे लक्ष द्यायचं”, असं ते म्हणाले.