चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. हा प्रतिक्षेत असलेले दोन्ही बोगदे नवीन वर्षात २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत, अशी माहिती पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथील प्रतीक्षेत असलेले दोन्ही बोगदे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहेत. कशेडी घाटाला पर्याय म्हणून येथील दोन्ही बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणा-या भाविकांसाठी एक बोगदा सुरु करण्यात आला होता. मात्र त्यांनतर काही त्रुटी आढळल्याने दोन्ही बोगदे बंद करण्यात आले होते. वीजेची कामे करण्यासाठी आणि बोगद्यात होत असलेल्या पावसाच्या पाण्याची गळतीमुळे हे बोगदे चर्चेचा विषय बनले होते. यावेळी राजकीय नेत्यांनी येथील कामाची पहाणी देखील केली होती.
आणखी वाचा-गुंगीचे शितपेय पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दापोलीत एकाला अटक
कशेडी घाटाला पर्याय म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही बोगदे लवकरच वहातूक सेवेसाठी खुले होणार आल्याने प्रवास कमी वेळेत आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. कशेडी येथील दुसऱ्या बोगद्यात आता पंखे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून रायगडमधील भोगाव जवळ एका पुलावर स्लॅब टाकण्याचे कामही सुरू आहे. कशेडी बोगद्यातील विद्युतीकरणासह इतर प्रलंबित कामे लवकरच पुर्ण करण्यात येत आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर असलेला हा कशेडी घाट अवघड व धोकेदायक म्हणून ओळखला जातो. हा कशेडी घाट अवजड वाहनचालकांना डोकेदुखी ठरला आहे. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरण कामात या घाटातून येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले होते. घाटाच्या दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आल्या नंतर कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. २२ सप्टेंबरपासून दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक पुर्णपणे थांबविण्यात आली. आता विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरु होणार आहेत. या बोगद्यात १० पंखे बसवण्याचे काम हाती घेतले घेण्यात आले असून २६ जानेवारीला हे दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.