राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी एक विधान केलं आहे. ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. काहींना सरस्वती तर काहींना शारदा आवडते. पण, महात्मा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली, असे भुजबळ यांनी म्हटलं.
एका कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.”
हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर आतापर्यंत किती हजार कोटी खर्च झालेत माहितेय का? आकडा सांगत राज ठाकरे म्हणाले…
“मुद्दामन संभाजी भिडे नाव ठेवण्यात आलं”
“संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राह्मण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दामन संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.
हेही वाचा : “जेवढे कार्यकर्ते तेवढेच खड्डे”, दीपाली सय्यद यांच्या टीकेला मनसे नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…
“…तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता”
“इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. कारण, जोपर्यंत आपला इतिहास माहिती होणार नाही, तोपर्यंत आपण भविष्याकडे बघू शकत नाही. राज्यक्रांतीकारकापासून समाजक्रांतीकारपर्यंत हा आपला वारसा आहे. महात्मा फुलेंनी सांगितलंय, ‘सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा.’ सत्ता असेल, तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता,” असेही छगन भुजबळ यांनी सांगितलं.