रोहित्र दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या साहेबराव देसले या कर्मचाऱ्यास येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. मुंगळे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सटाणा तालुक्यातील करंजाड येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात कनिष्ठ तंत्रज्ञ या पदी कार्यरत असताना २९ नोव्हेंबर २०१० रोजी देसलेने ही लाच स्वीकारली होती. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या पारनेर शिवारातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नव्हते. वारंवार हेलपाटे मारूनही उपयोग होत नव्हता. त्या वेळी रोहित्र दुरुस्ती करण्यासाठी देसलेने संबंधित शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केली होती. हे पैसे स्वीकारत असताना देसले लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकला होता. सटाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून देसलेला अटक करण्यात आली होती. येथील सत्र न्यायालयात झालेल्या खटल्याच्या सुनावणीत गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा