लग्नासाठी आपल्या जाती-समुदायातील मुलीच मिळत नसल्यामुळे कर्नाटकातून मुली विकत आणण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्हय़ात नुकताच उघड झाला आहे. अशा एका टोळीला सांगली पोलिसांनी नुकतेच पकडल्यावर त्यांनी ९ मुलींचे सौदे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जिल्हय़ातील एका समाजात उपवर मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. मुला-मुलींच्या व्यस्त प्रमाणामुळे वयाची चाळिशी गाठली, तरी या समाजातील तरुणांचे विवाह ठरणे दुरापास्त झाले आहे. तसेच या समाजातील उपवर मुली शेतकरी मुलांच्या स्थळास नकार देतात. यामुळे या समाजातील मुलांच्या लग्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या समाजातील वरपित्यांनी आता वधुसंशोधनासाठी जातीची बंधनेही सौम्य केली आहेत. पण तरीही त्यांना जिल्हय़ात वधू मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर उपाय म्हणून कर्नाटकातील अन्य एका समाजातील गरीब घरातील उपवर मुलींची खरेदी करण्याकडे आता या वरपित्यांचा कल दिसू लागला आहे. हे काम करण्यासाठीच या भागात गेल्या काही दिवसांपासून टोळय़ा कार्यरत झाल्या आहेत. यातील एक टोळी पोलिसांच्या हाती नुकतीच लागली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा सारा मुली विक्रीचा प्रकार समोर आला आहे.
सांगलीचे अप्पर अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी मिरजेतील एका लॉजवर नुकताच छापा टाकला. या वेळी त्यांनी अशा प्रकारे विक्रीसाठी आणलेल्या मुलींसह काही दलालांना ताब्यात घेतले. यातील दलाल असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर या दलालामार्फत सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ात आतापर्यंत ९ मुलींची विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
जात ‘पंचाईती’मुळे चि. सौ. कां.चा बाजार
लग्नासाठी आपल्या जाती-समुदायातील मुलीच मिळत नसल्यामुळे कर्नाटकातून मुली विकत आणण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्हय़ात नुकताच उघड झाला आहे. अशा एका टोळीला सांगली पोलिसांनी नुकतेच पकडल्यावर त्यांनी ९ मुलींचे सौदे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जिल्हय़ातील एका समाजात उपवर मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-07-2013 at 03:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bridal market due to caste panchayat