लग्नमंडपात हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच अचानकपणे नवरदेवाने लग्नास नकार दिल्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या नववधूने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील कुमठा नाका परिसरात घडली.
स्मिता (नाव बदलले आहे.) हिचे गणेश (नाव बदलले आहे.) या तरुणाबरोबर प्रेम जडले होते. त्यातून दोघांनी आयुष्यात एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला स्मिता हिच्या घरच्या मंडळींनी या विवाहाला विरोध केला. परंतु तिच्या हट्टामुळे त्यांचा नाईलाज झाला. ठरल्याप्रमाणे विवाहसोहळा सुरू झाला. अक्षतासोहळय़ाच्या आदल्या दिवशी घरात रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू होता. परंतु त्याच वेळी नवरदेव गणेश याने विवाह करण्यास अचानकपणे नकार दिला. त्यामुळे वधू पक्षाला धक्का बसला. विशेषत: स्मिता ही तर पार हादरून गेली. नवरदेव लग्नमंडपातून निघून जाताच वैफल्यग्रस्त झालेल्या नववधूने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी तातडीने छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील कारवाई सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा