प्रमुख वक्ते बाळ फोंडके यांच्या मार्मिक, अभ्यासपूर्ण  आणि ओघवत्या भाषणाने येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. ऋणानुबंध हे या अधिवेशनाचे ब्रीदवाक्य मनात ठेऊन त्यांनी रक्ताचे नाते, मानवी जीन्स आणि माणसाचा स्वभाव , सरोगेट प्रेग्नन्सी असे विविध विषयांचे सखोल विवेचन केले. तरीही विविध सांगितीत कार्यक्रमांमुळे रविवारचा दिवस संगीतप्रेमींसाठी पर्वणीच ठरला़
त्यानंतर राहुल देशपांडे आणि सहकारी यांचे संगीत मानापमान, महेश काळे यांचा मेलान्ज म्हणजे संगीतप्रेमींना एक पवर्णी होती. मानापमानमधील अनेक नाट्यगीतांनी ‘वन्स मोअर’ मिळवला. संगीत मानापमान सुरू होते त्याच दरम्यान इतर सभागृहात स्थानिक कलाकारांनी संगीत, नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम सादर केल़े  त्यात नरेंद्र दातार यांचा ‘स्वरगंध’, ह्युस्टनच्या वर्षां  हळबे यांचा ‘कोमल वृषभाचे देणे’ यांचा समावेश होता. एकाच वेळी सुरू असलेल्या दोन चांगल्या कार्यक्रमांपकी अनेकांनी एकच कार्यक्रम पाहिला अशी नाराजी रसिकांकडून कानावर आली़  उभ्या उभ्या विनोद हा उत्तर अमेरिकेतला कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडला . पण हा कार्यक्रमालाही समांतर आयोजनाचा फटका बसला. वॉिशग्टन डीसी मंडळाने सादर केलेली ‘उदाहरणार्थ  एक’ ही एकांकिका प्रेक्षकांना भावली.  अभिनेता प्रशांत दामले आणि  प्रसिद्ध दिग्दर्शन विजय केंकरे यांच्या गप्पांचा कार्यक्रम खूप रंगला. एक अभिनेता, गायक, निमा ता आणि माणुसकी जपणारा अशी ओळख असलेला प्रशांत दामले त्या गप्पांमधून प्रेक्षकांना जवळून बघता आला. गदी  वाढल्यामुळे लोक आग्रहास्तव हा काय क्रम एकाच दिवशी दोन वेळा घ्यावा लागला. विविध किस्से, गाणी यांनी रंगलेल्या या कार्यक्रमानंतर संगीतकार अजय- अतुल यांच्या गाण्याचा व त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम मुख्य सभागृहात होता. मेधा महेश मांजरेकर यांनी या गप्पांची सुरुवात केली. कमलेश भडकमकर आणि साथीदारांची साथ, ऋषिकेश रानडे, सावनी रिवद्र यांचे गायन आणि स्वत: अजय- अतुल यांनी गायलेल्या गीतांची झलक, त्यामागे असलेले किस्से यामुळे हा कार्यक्रम उत्तम झाला. प्रसिद्ध निर्माते आणि अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांचे लाडके महेश मांजरेकर यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम विशेष रंगतदार झाला. दिवसभरात कार्यक्रमाच्या मधल्या वेळात महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालये यांचे माजी विदयार्थी  एकमेकांना भेटले, एक्सपोमधील विविध बूथ्सना उपस्थितांनी भेटी दिल्या.   ‘फॅमिली ड्रामा’ या नाटकातील मनाचा ठाव घेणा-या आणि सहज अभिनयामुळे सुकन्या मोने यांच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. छायचित्र काढून घेण्यासाठी आज त्यांच्याभोवती चाह्त्यांची गदी  होती. साउंड सिस्टीम, माइक आणि इतर काही तांत्रिक बाबी यामुळे मुख्य सभागृहातल्या कार्यक्रमात आज व्यत्यय आला. ही एक बाब सोडली तरी इतर सर्व अतिशय चोख आयोजनामुळे  बीएमएमच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस हा संगीतप्रेमींकरता सुवर्ण दिवस ठरला. परदेशस्थ संगीतप्रेमींकरीता सुवर्ण दिन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brihan maharashtra mandal 16th conference at provinds