वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी भयंकर घटना घडली आहे.  भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

नेमकं प्रकरण काय?

नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले. मृत आरतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून एक महिन्यापूर्वीच ती कंपनीत कामाला लागली होती.

हेही वाचा >> वसईत भररस्त्यात प्रेयसीची हत्या, वाचवण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात लोक मग्न

लोकं व्हिडीओ काढण्यात मग्न

सकाळची वेळ असल्याने रस्त्यामध्ये प्रचंड गर्दी होती. आरोपी यादव आरतीवर वार करत असताना लोकं व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते. कोणीही तिला वाचवायला पुढे आले नाही. एक तरुण फक्त आरोपीला अडवायला पुढे होता. मात्र त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. लोकं पुढे आली असती तर आरतीचे प्राण वाचले असते, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader