बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना सुलभ पर्यटन करता यावे, यासाठी राज्यात २५ पर्यटनस्थळे निवडण्यात आली आहेत. “बुद्धिस्ट सर्किट” पर्यटन मार्ग तयार असून, त्यासाठी १० कोटी निधी मिळणार आहे.विदर्भातील बहुतांश ठिकाणांचा यात समावेश आहे. विदर्भातील पर्यटन विकासासाठी ५ कोटी खर्च होणार आहेत. नालासोपारा येथे नुकतेच नवीन स्तूप आढळले. पुरातत्त्व विभागाच्या वतीने तेथे संवर्धनाचे काम सुरू आहे. त्याच्या विकासासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी दिली.
औरंगाबादच्या वेरुळ व अजिंठा लेण्यांना भेट व पर्यटनासाठी बौद्ध अभ्यासक मोठय़ा संख्येने औरंगाबादला येतात. विदर्भातील काही पर्यटनस्थळे “बुद्धिस्ट सर्किट” विकसित करून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. विदर्भात “वाइल्ड लाईफ” पर्यटनाला गती दिली जाणार आहे. अशा ठिकाणचे पर्यटन मध्यमवर्गीयांनाही परवडावे, म्हणून “”डेक्कन ओडिसी”” गाडीचे दर बदलण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे विभागाला देण्यात आला आहे. राज्यातील विदेशी पर्यटकांच्या संख्येतही घट झाली आहे. २०१०-११ मध्ये ५१ लाख विदेशी पर्यटक राज्यात आले. २०११-१२ मध्ये ही संख्या ४८ लाख झाली. पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ३५ देशांमधील वाणिज्य दूतांना आमंत्रित केले असून, औरंगाबादेत दोन दिवसांच्या परिषदेला उद्या (शनिवारी) प्रारंभ होणार आहे. विदेशी पर्यटकांची संख्या नक्की किती, याची माहिती गोळा करण्यास संस्थाही नेमण्यात आली. कोणत्या वयोगटातले विदेशी पर्यटक कोणत्या स्थळांना भेटी देतात, याचे विश्लेषणही आता उपलब्ध होणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी सांगितले.गेल्या डिसेंबरमध्ये शिर्डीत १३ लाख भाविक होते, तर शनिशिंगणापूरमध्ये ही संख्या ८ लाख होती, तरीही देशांतर्गत पर्यटनात दक्षिणेतील राज्य आघाडीवर आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा