लोकसत्ता वार्ताहर

अहमदनगर : नदीपात्रामध्ये असलेल्या समर्थ बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली आहे. यावेळी शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्यामुळे इतर १५ ते २० म्हशींचे प्राण वाचले असून स्वतः शेतकऱ्याचादेखील जीव वाचला आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

याबाबत घडलेली घटना अशी की शेतकरी सोपान बरबडे हे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशी चारण्यासाठी या परिसरामध्ये घेवून आले होते. यानंतर म्हशी तहान लागल्याने कर्जत शहरातील लेंडी नदीवर समर्थ बंधारा आहे त्या बंधार्‍यामध्ये पाणी पिण्यासाठी आल्या. नेहमीप्रमाणे या सर्व म्हशी पाण्यामध्ये जात असताना सर्वप्रथम चार मशीन पाण्यामध्ये गेल्या. त्यामध्ये विजेचा प्रवाह आलेला होता आणि अवघ्या काही सेकंदात या चारही म्हशी विजेचा धक्का बसल्यामुळे तडफडून पाण्यात कोसळल्या. पाणी पाजण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या हे लक्षात आले. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत पाठीमागून पाण्याजवळ धावत येत इतर सर्व म्हशींना पाण्यामध्ये प्रवेश करू न देता पाठीमागे ढकलले. यामुळे इतर पंधरा ते वीस म्हशींचे प्राण वाचले. यावेळी पाण्यापासून स्वतःला लांब ठेवल्यामुळे या शेतकऱ्याचा देखील जीव वाचला.

आणखी वाचा- Sharad Pawar : महायुती सरकार आल्याने काय बदल घडला? शरद पवारांचा ‘तो’ फोटो शेअर करत भाजपाचा चिमटा

त्या शेतकऱ्याने तात्काळ महावितरण कंपनीच्या कर्जत कार्यालयाला फोन करून माहिती कळवली. यानंतर त्यांनी तात्काळ या परिसरातील विजेचा प्रवाह बंद केला. दरम्यान यानंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी घेऊन त्यांनी पंचनामा केला आहे . या परिसरातून जाणारी वीज वाहक तार तुटून ती पाण्यामध्ये पडली होती व त्याचा प्रवाह पाण्यामध्ये उतरला असल्याचे दिसून आले.

तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील शविच्छेदन केले आहे. शेतकरी सोपान बरबडे यांनी कर्ज काढून या सर्व म्हशी खरेदी केल्या असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.