बुलढाण्यात नांदुरा-मलकापूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने एक भरधाव आयशर ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीत घुसला. ट्रकने झोपडीत झोपलेल्या १० मजुरांना चिरडलं असून या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले आहेत. तर ६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सहा जखमींपैकी दोघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे सर्व मजूर महामार्गाच्या कामासाठी आले होते. रस्त्यालगतच त्यांची झोपडी होती. रात्री हे मजूर गाढ झोपेत असताना एक भरदाव ट्रक त्यांच्या झोपडीत घुसला. बुलढाण्यातल्या नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील ही घटना आहे. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

महामार्गाचं काम करत असलेले मजूर रात्री त्यांचं काम संपवून रस्त्यालगतच्या झोपडीत आराम करत होते. त्याच वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरदाव ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक त्या झोपडीत घुसला. या अपघातात चार मजूर जागीच ठार झाले तर सह जाण गंभीर जखमी झाले आहेत. झी २४ तास वाहिनीने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दिवस-रात्र या मार्गावरून वाहनांची ये-जा सुरूच असते. या मार्गावर प्रामुख्याने ट्रकची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> “यांना वाघनखे टोचतात अन् पेंग्विन घेऊन, हे…”, भाजपाची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

अपघातात निधन झालेले मजूर हे चिखलदऱ्यातून नांदुऱ्यात रस्त्याच्या कामासाठी आले होते. प्रकाश बाबू जांभेकर (२६), पंकज तुळशीराम जांभेकर (२६), अभिषेक रमेश जांभेकर (१८) अशी अपघातात निधन झालेल्या तीन मजुरांची नावं आहेत. चौथ्या मजुराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याचं नाव कळू शकलं नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldana accident speeding truck rammed into roadside hut ran over 10 laborer asc