Buldhana Accident: विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बसचा टायर फुटून ती उलटली आणि बसला आग लागली. या आगीत होरपळून २५ प्रवासी ठार झाले आहेत. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट?

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ८ जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.

अपघतातील मृतदेहांची ओळख पटवण्याचं आव्हान आहे. कारण मृतदेह होरपळले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ड्रायव्हर वाचला आहे त्याची चौकशी सुरु आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं. बस जर पोलवर आदळली ही मानवी चूक असू शकते. पण आज त्यावर बोलणं योग्य होणार नाही. जो काही प्रकार घडलाय तो गंभीर आहे. आत्ता आम्ही घटना स्थळावर जातो आहोत. समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी उपाय योजना आपण करतो आहोत. स्मार्ट सिस्टिमही बसवण्याचं काम सुरु आहे. चालक यांना सूचना कशा देता येतील? ते टोल नाक्यावर आल्यानंतर त्यांना सूचना कशा देता येतील याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाला होता तेव्हा अपघात वाढले होते. नेमून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने चालक गाडी चालवतात अशा गोष्टींमुळे या घटना घडतात. त्यामुळे प्रबोधन करणं आवश्यक आहे तेदेखील करण्याचा प्रयत्न आमचा आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं.

बस अपघातातून वाचलेल्या दोन प्रवाशांनी काय सांगितलं आहे?

नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बस मध्ये आम्ही बसलो होतो. रात्री आमचं जेवण झालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही बस उलटली. बस उलटल्यानंतर बसने पेट घेतला. आम्ही १९ आणि २० नंबरच्या सीटवर बसलो होतो. वरची काचेची खिडकी आम्ही तोडली आणि बाहेर पडलो. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली. अशीही माहिती या प्रवाशांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर घटना स्थळी पोलीस आले, अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली असंही या दोन प्रवाशांनी सांगितलं.

पोलिसांनी या अपघाताविषयी काय सांगितलं?

साधारण रात्री दीडच्या सुमारास या बसचा अपघात झाला. या बसमध्ये ३२ प्रवासी होते. २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. इतर प्रवासी वाचले आहेत. बस उलटल्यानंतर या बसने पेट घेतला. डीझेल टँक फुटून आग लागली आणि वाढली त्यामुळे बसमधले प्रवासी होरपळले. काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडले असंही पोलिसांनी सांगितलं. बसच्या केबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. एकजण झोपला होता तर दुसरा गाडी चालवत होता. एक चालक बचावला असून दुसऱ्याचा मृत्यू झाला अशीही माहिती पोलिसांनी दिली.