सातारा – शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या बैल बेंदूर सणासाठी सातारा जिल्ह्यात व शहरातील मोती चौक आणि राजवाडा परिसरात मातीचे तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बैल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांचा अतिशय आवडता असा हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो पूर्वीपासून व आजही घरोघरी असणाऱ्या बैलांच्या जोड्यांचे पूजन केले जाते घरोघरी मातीचे बैल आणून त्यांची पूजा केली जाते .यासाठी सातारा शहरातील राजवाडा व मोती चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लाल मातीचे न रंगवलेले बैल ही विक्री उपलब्ध झाले आहेत. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अतिशय देखण्या अगदी दोन ते अडीच फूट उंचीपर्यंतच्या बैलांच्या जोड्या ही लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत.वाई शहरातही बैल रंगविण्याचे साहित्य घेण्यास बाजारात शेतकरी वर्गाची मोठी गर्दी आहे.
बैल बेंदूर हा मूळ नक्षत्रावर संपन्न केला जातो. यासाठी मूळ अर्थात जवळ हे कोकणातून विक्रीसाठी हातात घेऊन विकताना महिला तसेच वृद्ध व्यक्ती दिसत आहेत .घराला लावण्यात येणाऱ्या आंब्याच्या पानाचे काथ्यामध्ये बनवलेले तोरणही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहे. बेंदूर दिवशी घरोघरी गोडधोड करून पूर्ण चा नैवेद्य बैलांना दाखवून खाऊ घातला जातो .त्या दिवशी बैलांच्या जोड्या स्नान घालून त्यांना सजून झूल, गोंडे ,तोरण, हार घालून त्यांची भव्य मिरवणूक काढली जाते .यासाठीही सातारा शहरातील व जिल्ह्यातील अनेक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत बाजारात बैलपोळा (बेंदूर) सणानिमित्त बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होती.