कर्नाटकातील कारागृहातून जामीनवर बाहेर आल्यानंतर सांगलीसह रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या पंढरपूरच्या तरुणास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीतील १ लाख ६० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिने असा १८ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुरुवारी दिली.
हेही वाचा >>> कराड : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य करावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान
तासगाव, इस्लामपूर, आष्टा, शाहूपुरी कोल्हापूर आणि दापोली आदी ठिकाणी बंद घरे फोडून ऐवज लंपास करण्यात आला होता. संशयित लखन कुलकर्णी उर्फ सचिन माने (वय ३०, रा. अनिलनगर, पंढरपूर) हा सांगलीत आल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून ३० तोळे सोन्याचे व १५१ ग्रॅम चांदीचे दागिने आणि १ लाख ६० हजार रोख असा सुमारे १८ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आले असून न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने दिले आहेत.