सांगली : तासगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये १६ ठिकाणी घरफोड्या करणार्‍या अट्टल तीन चोरट्यांना पोलीसांनी अटक करून १९ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात तासगाव पोलीसांना यश मिळाले असल्याची माहिती उप अधिक्षक सचिन थोरबोले यांनी बुधवारी दिली. या टोळीतील दोघे फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

घरफोडी अटक करण्यात आलेल्यामध्ये जितेंद्र दगडू काळे (वय ४८), संजय जंगाप्पा काळे (वय ४०) आणि निहाल जितेंद्र काळे (वय १९ सर्व रा.करगणी ता. आटपाडी) यांचा समावेश असून रोहित पवार (रा. करगणी ता. आटपाडी) व सनी अर्जुन शिंदे (रा. फलटण, जिल्हा सातारा) हे फरार आहेत.

Sharad Pawar On Anil Deshmukh Attack
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही प्रवृत्तींना…”
Attack on Anil Deshmukh, Supriya Sule First Reaction
Anil Deshmukh Attack : अनिल देशमुख यांच्यावर हल्ला,…
Sanjana Jadhav Cried in Rally
Sanjana Jadhav : संजना जाधव भरसभेत ढसाढसा रडल्या, “वाट्टेल ते आरोप सहन केले, माझ्या जागी हर्षवर्धन जाधवांनी दुसरी…”
ahmednagar temperature at 12 6 degrees celsius lowest in maharashtra
Maharashtra Weather Update : नगरमध्ये पारा १२.६ अंशांवर; जाणून घ्या, राज्यभरात थंडी का वाढली
Maharashtra Top Politicians Social Media Followers in Marathi
Maharashtra Top Politicians Followers : सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस; जाणून घ्या, महाराष्ट्रातील टॉप नेत्यांचे फॉलोअर्स
Why Manda Mhatre Emotional After Eknath Shinde's Words
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘ते’ वाक्य आणि मंदा म्हात्रेंना अश्रू अनावर, काय घडलं प्रचारसभेत?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “काँग्रेसवाले निवडणुकीपुरतं आश्वासन देतात, पण…”, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन “अजित पवारांना तीन-तीनदा उपमुख्यमंत्री केलं, आता युगेंद्रला..”
ajit pawar sharad pawar (5)
अजित पवार म्हणाले, “गेल्या वेळी मी जरा एकटा पडलो होतो, पण यावेळी माझी आई…”!

आणखी वाचा-अदृष्य शक्ती मराठा-ओबीसी समाजाला भिडवण्याचे काम करत आहेत – प्रकाश आंबेडकर

घरफोडी व चोरी प्रकरणाचा पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाने याबाबत तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय बातमीदारांमार्फत तपास सुरू होता. तपास करीत असताना करगणी येथील काही चोरीचे प्रकार करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या तिघांना ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांनी १६ घरपोडींचे गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली. या टोळीने गुन्ह्यात वापरलेला टेम्पो (एम.एच. १० सीआर १९७७) व घरफोडीच्या गुन्ह्यात चोरी केलेले एकूण तीनशे दोन ग्रॅम वजनाचे व १८ लाख ४२ हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे व ६१ हजार दोनशे रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण २६ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला.

तासगाव तालुक्यातील वायफळे, मांजर्डे, बलगवडे, नागेवाडी, हातनोली, गौरगाव, वायफळे, बिरणवाडी, वासुंबे, बलगवडे, बस्तवडे या गावात १६ ठिकाणी वरील आरोपींनी घरफोड्या केल्याचे संशयितांनी कबूल केले असल्याचे निरीक्षक श्री. वाघ यांनी सांगितले.