सावंतवाडी : वेंगुर्ले, तालुक्यातील खवणे येथे रात्री वस्तीला असलेली बस कुडाळच्या दिशेने जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे बस घळणीमध्ये पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सकाळी घडली. गाडीतील चालक-वाहक यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, खवणे-कुडाळ गाडी वळवण्यासाठी वरच्या मारुती मंदिराकडे नेत असताना केळुस्कर यांच्या घरासमोरील घळणीत पलटी होऊन अपघात झाला. गाडीतील वाहक व चालकाला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे सुदैवाने मोठी आणि टळली आहे. वस्तीच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना हा अपघात झाल्याने गाडीत प्रवासी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला आहे. खवणे गावात एसटीचा एवढा मोठा अपघात पहिल्यांदाच झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथे एसटी बस पलटी ; चालक-वाहक किरकोळ जखमी
खवणे गावात एसटीचा एवढा मोठा अपघात पहिल्यांदाच झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-02-2025 at 14:55 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus overturned at khavane in vengurla taluka zws