Pandharpur Bus Accident : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. खाजगी बस डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली मधील दोन ते तीन गावामधून चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस २० फूट खाली कलंडली, यात बसमधले प्रवाशी जखमी झाले. यात तीन भाविक जागीच ठार झाले तसेच दोन ट्रॅक्टर मधले प्रवाशी मृत पावले. तर बस मधले सात प्रवाशी गंभीर जखमी असून, त्याच्यावर कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत , तर ४२ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत .

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातामधील मृतांची नावे

१)गुरुनाथ बापू पाटील
२)रामदास नारायण मुकादम
३) होसाबाई पाटील

तसेच ट्रॅक्टर मधील दोन पुरुष यांचे मृतदेह सापडले आहेत, त्यांची ओळख पटलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus tractor accident on mumbai pune express five killed more than 40 injured asj
Show comments