लोकसत्ता टीम
छत्रपती संभाजीनगर, जालन्यातील अंतरवली येथील मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेली दगडफेक, जाळपोळ पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाकडून पुणे, अहमदनगर, बीड, जालना, पैठण मार्गावरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कन्नड, सिल्लोड मार्गावरील बसची प्रवासी वाहतूक अंतरिम सुरू ठेवली आहे.
या संदर्भातील माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्याचे दररोज प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न ५० लाखांचे आहे. मात्र वरील मार्गावरील बसच्या फेऱ्या बंद ठेवल्यामुळे सकाळच्या टप्प्यात १५ लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळपर्यंतच्या आलेल्या अहवालानुसार ४ बस जाळल्या, तर ३ बसवर दगडफेक झाल्याची माहिती असून त्यातले नुकसान वेगळे नोंदवले जाते. एका चालकाला मारहाण झाली, तर एकाचा मोबाईल फोन फोडला. एका चालकासह काही प्रवाशांच्याही बॅगा त्यांना बसमधून काढता आल्या नाहीत. १०.३० नंतर अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाचे स्वरूप पाहून आणि मार्गावरील पूर्ण परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल.