सॅटरडे क्लब ऑफ ग्लोबल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा ‘बिझिनेस एक्सलन्स’ पुरस्कार यंदा येथील ई अॅण्ड जी रिसोर्ट्स कंपनीला प्रदान करण्यात आला. बांधकाम क्षेत्रात पर्यावरणाचा गांभिर्याने विचार करताना त्यानुसार नवे बदल व संशोधन करण्याची गरज प्रकर्षांने मांडून त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या ई अॅण्ड जी ग्लोबल ट्रस्ट उद्योग समुहाच्या कंपनीच्या कामगिरीची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. उद्योग समुहाचे अध्यक्ष अविनाश शिसोदे यांनी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारला.
कंपनीच्या त्र्यंबकेश्वर येथील ग्रीन व्हॅली रिसॉर्ट येथे आयोजित पत्रकार परिषदेत संचालक देवा चौधरी यांनी या संदर्भात माहिती दिली. चार वर्षांपूर्वी ई अॅण्ड जी ग्लोबलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. अल्पावधीत उद्योग समुहाचा प्रचंड असा विस्तार झाला. बांधकाम क्षेत्रातील घडामोडी, त्यातून निर्माण होणारे रोजगार, दुसरीकडे अर्निबध बांधकामांचा पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, त्याविषयी बांधकाम व्यावसायिकांचे उत्तरदायित्व याचा शिसोदे यांनी अभ्यास केला आहे. भारंभार बांधकामे करण्याऐवजी नव्या जगाची गरज लक्षात घेऊन पर्यावरणस्नेही बांधकामे करण्यावर उद्योग समुहाने कटाक्षाने लक्ष दिले. त्यातून रचनात्मक कामांना सुरूवात झाली. आजमितीस ई अॅण्ड जी ग्लोबल उद्योग समुहाने बांधकामाबरोबर विपणन, रिसॉर्ट, वित्त, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही विस्तार केला आहे. त्र्यंबकेश्वरजवळील तळवाडे येथे ग्रीन व्हॅली आणि झारवडचा ग्रीन फिल्ड हे विकेन्ड होम प्रकल्प आणि रिसॉर्ट संकल्पनेच्या पातळीवर बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय मानले जातात, असेही चौधरी यांनी नमूद केले. उद्योग समुहाच्या वाटचालीत गणेश अहिरे, एच. एम. पाटील, देवा चौधरी, अश्विनी धुपे, प्रसन्ना धामणे, गुलाबसिंग गिरासे या संचालकांची महत्वपूर्ण योगदान लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा