केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. तसंच, आगामी निवडणुकांसाठी शरद पवार गटाला नाव आणि चिन्हासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीतील या फुटीप्रकरणी घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. तसंच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार म्हणाले, “केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं. असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!”

अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली?

“गेल्या वर्षी राजकीय घडामोडी राज्यात घडल्या. कोणत्याही पक्षासंदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची परंपरा आहे. त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. त्यामध्ये आम्हीही आमचं म्हणणं मांडलं, इतरांनीही त्यांचं म्हणणं मांडलं. त्यावर अनेक तारखा पडल्या. सगळ्या वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिलं जातं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ, झेंडा सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, बाबा आत्रम, आदिती तटकरे यांच्याह ५० आमदारांनी घेतलेल्या निर्णयावर आज निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. हा निकाल मी विनम्रपणे स्वीकारतो. आम्ही निवडणूक आयोगाचेही आभार मानतो”, असं अजित पवार म्हणाले.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया?

आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.