‘ए मेरे वतन के लोगों..’ या अजरामर देशभक्तीपर गीताला संगीत देणारे आणि साई दरबारी अनेकदा आपल्या सादर करणारे रामचंद्र नरहर चितळकर तथा सी. रामचंद्र हे हयात असते, तर त्यांच्यावर ‘ए मेरे गाव के लोगो, जरा याद मुझे भी कर लो..’ असे म्हणण्याची वेळ आली असती.
भारत-चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला सी. रामचंद्र ऊर्फ रामचंद्र नरहर चितळकर यांनी संगीतबद्ध केले होते. २६ जानेवारी १९६३ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत दिल्लीतील रामलीला मैदानावर हे गीत प्रथम सादर करण्यात आले. या गाण्याने भावुक झालेल्या नेहरुंनी या कलाकाराची पाठ थोपटली होती, या घटनेला नुकतीच ५० वर्षे झाली.
देशभर या घटनेच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत असताना, रामचंद्र यांचे जन्मगाव (तालुका राहाता, जिल्हा नगर) पुणतांबा मात्र त्याला अपवाद आहेत. हे अजरामर गीत, त्यातील भूमिपुत्राचा सहभाग, त्याचा सुवर्णमहोत्सव हे काहीच पुणतांबेकरांच्या गावीही नाही. विशेष म्हणजे संगीतकार म्हणून नाव कमावल्यावरही सी. रामचंद्र यांचे गावी वरचेवर येणेजाणे होते. त्यांचा जन्म शिर्डी जवळील पुणतांब्याजवळील चितळी येथे येथे सन १९१८ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथील शाळेतच झाले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते.  त्यांच्या वडिलांनी शेती करण्यासाठी काही काळ त्यांना पुणतांबा येथे आणले होते. मात्र ते येथे रमले नाहीत. संगीतकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश केल्यानंतर रामचंद्र चितळकर यांनी आपल्या नावात बदल केला. अनारकली चित्रपटातील हिट गीतांनी लता मंगेशकर व सी. रामचंद्र ही गायक संगीताकाराची जोडी विशेष गाजली. त्यांनी हिंदूी बरोबरच मराठी, तेलगू, तमीळ आणि भोजपुरी गीतांनाही संगीत दिले. साईबाबांच्या नावाने न्यूसाई प्रॉडक्शनच्या बॅनरखाली त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. ५ जानेवारी १९८२ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. सध्या पुणतांबा येथे सी. रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेला वाडा पुणतांब्यात अजूनही शाबूत आहे. त्यांचे पुतणे प्रभाकर चितळकर कुटुंबीयांसह येथे राहतात. त्यांच्याकडे रामचंद्र यांचा फोटोही नाही, मात्र रामचंद्र यांची हार्मोनियम त्यांनी जपून ठेवली आहे. रामचंद्र साईदरबारी नेहमी हजेरी देत. त्यावेळी आवर्जून पुणतांबा येथे जात. आज देशभर त्यांच्या गीतांची चर्चा होत असताना, पुणतांबेकर मात्र अनभिज्ञ आहेत. गावाने या कलाकाराच्या स्मृती जपायला हव्यात, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने उमटली.

mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
mukesh khanna reacts on sonakshi sinha post
“आपल्या संस्कृतीत…”, सोनाक्षी सिन्हा भडकल्यावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण; शत्रुघ्न सिन्हांचे नाव घेत म्हणाले…
Amit Shah On Rahul Gandhi :
Amit Shah : “काही जण ५४ व्या वर्षी स्वतःला युवा नेता म्हणतात”, अमित शाह यांची राहुल गांधींवर खोचक टीका
Story img Loader