‘ए मेरे वतन के लोगों..’ या अजरामर देशभक्तीपर गीताला संगीत देणारे आणि साई दरबारी अनेकदा आपल्या सादर करणारे रामचंद्र नरहर चितळकर तथा सी. रामचंद्र हे हयात असते, तर त्यांच्यावर ‘ए मेरे गाव के लोगो, जरा याद मुझे भी कर लो..’ असे म्हणण्याची वेळ आली असती.
भारत-चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला सी. रामचंद्र ऊर्फ रामचंद्र नरहर चितळकर यांनी संगीतबद्ध केले होते. २६ जानेवारी १९६३ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत दिल्लीतील रामलीला मैदानावर हे गीत प्रथम सादर करण्यात आले. या गाण्याने भावुक झालेल्या नेहरुंनी या कलाकाराची पाठ थोपटली होती, या घटनेला नुकतीच ५० वर्षे झाली.
देशभर या घटनेच्या स्मृतींना उजाळा देण्यात येत असताना, रामचंद्र यांचे जन्मगाव (तालुका राहाता, जिल्हा नगर) पुणतांबा मात्र त्याला अपवाद आहेत. हे अजरामर गीत, त्यातील भूमिपुत्राचा सहभाग, त्याचा सुवर्णमहोत्सव हे काहीच पुणतांबेकरांच्या गावीही नाही. विशेष म्हणजे संगीतकार म्हणून नाव कमावल्यावरही सी. रामचंद्र यांचे गावी वरचेवर येणेजाणे होते. त्यांचा जन्म शिर्डी जवळील पुणतांब्याजवळील चितळी येथे येथे सन १९१८ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथील शाळेतच झाले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांच्या वडिलांनी शेती करण्यासाठी काही काळ त्यांना पुणतांबा येथे आणले होते. मात्र ते येथे रमले नाहीत. संगीतकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश केल्यानंतर रामचंद्र चितळकर यांनी आपल्या नावात बदल केला. अनारकली चित्रपटातील हिट गीतांनी लता मंगेशकर व सी. रामचंद्र ही गायक संगीताकाराची जोडी विशेष गाजली. त्यांनी हिंदूी बरोबरच मराठी, तेलगू, तमीळ आणि भोजपुरी गीतांनाही संगीत दिले. साईबाबांच्या नावाने न्यूसाई प्रॉडक्शनच्या बॅनरखाली त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. ५ जानेवारी १९८२ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. सध्या पुणतांबा येथे सी. रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेला वाडा पुणतांब्यात अजूनही शाबूत आहे. त्यांचे पुतणे प्रभाकर चितळकर कुटुंबीयांसह येथे राहतात. त्यांच्याकडे रामचंद्र यांचा फोटोही नाही, मात्र रामचंद्र यांची हार्मोनियम त्यांनी जपून ठेवली आहे. रामचंद्र साईदरबारी नेहमी हजेरी देत. त्यावेळी आवर्जून पुणतांबा येथे जात. आज देशभर त्यांच्या गीतांची चर्चा होत असताना, पुणतांबेकर मात्र अनभिज्ञ आहेत. गावाने या कलाकाराच्या स्मृती जपायला हव्यात, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने उमटली.
सी. रामचंद्र यांचे जन्मगावालाच विस्मरण..
‘ए मेरे वतन के लोगों..’ या अजरामर देशभक्तीपर गीताला संगीत देणारे आणि साई दरबारी अनेकदा आपल्या सादर करणारे रामचंद्र नरहर चितळकर तथा सी. रामचंद्र हे हयात असते, तर त्यांच्यावर ‘ए मेरे गाव के लोगो, जरा याद मुझे भी कर लो..’ असे म्हणण्याची वेळ आली असती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-02-2013 at 04:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: C ramchandra born place forgot him