सावंतवाडी : रानमोडी या वनस्पतीचा नरकासुर आणि होळी सणाला दहन करून बिमोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान काळसे धामापूर तलावाच्या परिसरातील रानमोडीचे नरकासुर समजून दहन करण्यात आले.

‘जागतिक वारसा स्थळ’ सन्मान प्राप्त ‘धामापूर तलावाला’ शिवपूर्वकालीन जंगलाचा इतिहास लाभला आहे.तेव्हापासून हे जंगल ‘राखीव जंगल’ म्हणून जपलं जात आहे.प्रादेशिक,दुर्मिळ आणि अतिदुर्मिळ वनस्पतींचा अधिवास असलेलं हे जंगल,आता काही आक्रमक वनस्पतींनी ग्रासलं आहे.यामुळे जंगलातील लहान झुडपे,गवत,वेलींसहीत सर्व जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आलं आहे.

हेही वाचा…Shivsena UBT Letter : मनसेविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, दीपोत्सवावरून थेट निवडणूक आयोगाला पत्र; अमित ठाकरे अडचणीत येणार?

रानमोडी ही अशीच एक आक्रमक वनस्पती.काही वर्षांपासून ती गावागावांत मोठ्या प्रमाणावर दिसू लागलीय.ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत जाते व इतर वनस्पतींना नष्ट करते.आपल्या गावातील जंगल,बागायती,शेती या वनस्पतीमुळे धोक्यात यायला लागल्या आहेत.त्यामुळे यापुढे कोकणातल्या प्रत्येकासमोर हे एक मोठं आव्हान म्हणून उभं राहत आहे.हिचा अटकावं करण्यासाठी तिला फुलोरां येण्याअगोदरच तिला मुळासकट काढून नष्ट करणे हाच एक पर्याय. आपल्या सणांच्या माध्यमातून हे करता येणं शक्य आहे.नरकासुर म्हणजे वाईट शक्ती,जी सध्या आपल्याला या आक्रमक वनस्पतींमध्ये दिसून येते.नरकासुराच्या प्रतिकात्मक दहनातुन आपल्या पिकांना त्रासदायक ठरणाऱ्या या वनस्पती नष्ट करणे हाच या रानमोडीच्या नरकासूराचा उद्देश.यावर्षी काळसे-धामापूर मधील ‘वयम् फॉरेस्ट नर्सरी’ व ‘वनविभाग’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून याच वनस्पतीचा नरकासुर बनवण्यात आला.यासाठी काळसे-धामापूर राखीव जंगल,काळसे होबळीचामाळ या दोन ठिकाणी वाढलेल्या हानिकारक आक्रमक रानमोडीचे उच्चाटन करण्यात आले.वनविभागाच्या वतीने वनरक्षक शरद कांबळी आणि सहकारी अनिल परब यांनी आपले योगदान दिले.

हेही वाचा…Raj Thackeray : “जे. जे. स्कूल ऑफ आर्ट नसतं तर मी प्लंबर, फिटर किंवा..”, काय म्हणाले राज ठाकरे?

जैवविविधता राखण्यासाठी फक्त ‘वृक्षारोपण’ नाही तर आक्रमक वनस्पतींचे ‘उच्चाटन’ही तेवढेचं गरजेचं आहे.कारण वेली,गवत, झुडपे यांचे अस्तित्व असेल तरच जंगल परिसंस्था टिकून राहिल. ‘वयम फॉरेस्ट नर्सरी’ यासाठी दरवर्षी ‘नरकासुर’ आणि ‘होळी’ या सणांच्या माध्यमातून आक्रमक (Invasive species) प्रजातींना आटोक्यात आणण्यामध्ये खारीचा वाटा उचलते आहे.पण यासाठी बरंच काम होणं गरजेचं आहे.हा त्रास कोकणातील सर्व गावामध्ये वाढत असल्यामुळे पुढील वर्षांपासून सर्वांनी या उपक्रमाचे अनुकरण करून या वनस्पतींपासून आपले गाव वाचवावे असे आव्हानही त्यांनी केले आहे.