लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेद्वारे कोणताही भेदभाव न करता प्रत्येक प्रौढ भारतीयाला मतदानाचा अधिकार दिला आहे. परंतु आमच्या या मताधिकाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचा भाजप ‘व्होट जिहाद’ म्हणत ‘धर्मयुद्ध’ चा नारा देतात. यातून दोन धर्मात तेढ निर्माण करून देश तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप एमआयएमचे नेते, खासदार बॅ. असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. दरम्यान जुनी काँग्रेस आता ‘म्हातारी’ झाली आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार फारूख शाब्दी यांच्या प्रचारार्थ सिद्धेश्वर पेठेतील पानगल प्रशालेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेसाठी तरूणाईसह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

आणखी वाचा-Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

बॅ. ओवैसी यांनी राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक प्रश्नांच्या मुद्द्यांवर भाष्य करताना महायुती आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडून भाजपने राज्यात सत्तांतर घडवून आणले. यातून सत्तेत आलेल्या शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना नोकऱ्या मिळाल्या. भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलेल्या नेत्यांना सत्ता संरक्षण मिळाले. तर दुसरीकडे जुनी काँग्रेस आता ‘म्हातारी’ झाली आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची त्यांनी खिल्ली उडवली.

लोकसभा निवडणुकीत पराभव होताच केवळ राजकीय स्वार्थासाठी विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी का आणली नाही, असा सवाल करीत बॅ. ओवैसी यांनी लाडक्या बहिणींना एकीकडे दरमहा १५०० रुपये दिले आणि दुसरीकडे महागाईचा वनवा पेटवून याच लाडक्या बहिणीकडून १९०० रुपये काढूनही घेतले. विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने ‘बटेंगे तो कटंगे’ च्या खोट्या अफवा पसरवून हिंदू-मुस्लिमांनी लढाईचा खेळ खेळू नये. महागाई, बेरोजगारीसह सामान्य जणांच्या दररोजच्या जीवनातल्या रणांगणावरच्या लढाईवर महायुतीने बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले. भाजपने देशात स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे अड्डे निर्माण केले आहेत. त्यावर काँग्रेससह इतर विरोधक तोंड न उघडता निष्क्रिय भूमिका घेत असल्याबद्दल ओवैसी यांनी भाजप आणि काँग्रेस दोघेही एकच असल्याचा आरोप केला.

आणखी वाचा-लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले

ओवैसींना पोलिसांची नोटीस

ओवैसी यांचे सोलापुरात सभास्थळी आगमन होताच व्यासपीठावर आलेल्या पोलिसांनी त्यांना सार्वजनिक शांतता भंग करणारे चिथावणीखोर भाषण न करण्याबद्दल नोटीस बजावली. ही नोटीस मराठी भाषेत होती. आपणास मराठी भाषा कळत नाही, इंग्रजी भाषेत नोटीस द्या, वाचून सही करतो, असे ओवैसी यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इंग्रजी भाषेत नोटीस बजावली. या नोटिशीचे ओवैसी यांनी जाहीरपणे वाचन करताना त्यातील स्पेलिंगसह चुकांचा पंचनामा केला.

Story img Loader