लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महापालिका क्षेत्रातील तीनही शहरात लावण्यात आलेले बेकायदा फलक आणि अतिक्रमणाविरुद्ध मोहीम हाती घेण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.

महापालिकेच्या सर्व विभागप्रमुख, अतिरिक्त व उपायुक्तांची आढावा बैठक आयुक्त श्री. गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडली. महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये विनापरवाना उभारण्यात आलेले फलक, रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमणे यांची तातडीने पाहणी करून विनापरवाना फलक व अतिक्रमणे हटविण्याची सूचना यावेळी देण्यात आली.

आणखी वाचा-पुणे-हुबळी वंदेभारत एक्स्प्रेसला मंजुरी

अतिक्रमणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे त्याची मोजदाद करून ती रक्कम शहर अभियंत्यांनी संबंधितांकडून वसूल करावी, असेही आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, सर्व अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader