सिनेटची निवडणूक स्थगित झाली कारण मिंधे आणि भाजपा गटाची तयारी नाही. कार्यक्रमत तयार होता तरीही निवडणूक स्थगित झाली. अशा गोष्टी घडणं लोकशाहीसाठी घातक आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्याआधी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुका स्थगित होणं हे घातक आहे. देशात आपल्या लोकशाही नाहीये असंच समजून आता आपल्याला काम करावं लागणार आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. त्यामागे नेमकं कोण आहे हे तपासून बघावं लागेल असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

बालेकिल्ला वगैरे काही नसतो..

तुम्ही छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात चाललात का? असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले बालेकिल्ला कुणाचाही नसतो. मी तिथल्या तरुणांशी संवाद साधण्यासाठी चाललो आहे. नितीन गडकरीच नाही अनेक लोक आता हेच सांगत आहेत. आत्ता जे घटनाबाह्य सरकार बसलं आहे त्यात दोन पक्ष फोडण्यात आले. एक परिवार फोडला. पण जे कॅबिनेट त्यांनी बसवलं आहे त्यात भाजपाला काय मिळालं? ज्यांनी २५ ते ३० वर्षे पक्षासाठी दिली आहेत अशांना काहीही मिळालेलं नाही. पाच ते सहा जण मंत्री आहेत बाकी सगळे इंपोर्टेड आहेत आणि दुसऱ्या पक्षातले रिजेक्टेड आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपा महाराष्ट्राला मागे नेत आहे अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.

सिनेटची निवडणूक शुक्रवारी स्थगित

मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या निर्णयानंतर तयारी करत असलेल्या युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेनेला मोठा धक्का बसला आहे. यावरून युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. सिनेट निवडणुकीला सामोरं जायला मुख्यमंत्री घाबरतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. आता मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्र लिहित भाजपावर टीका केली.

राज्यपाल रमेश बैस यांना लिहलेल्या पत्र अमित ठाकरे म्हणाले, “मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश’ येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancellation of elections is dangerous we have to move forward knowing that there is no democracy in the country said aaditya thackeray scj
Show comments