गेल्या वर्षभरापासून पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या उमेदवारास उपविभागीय अधिकारी कार्यालयातून चुकीची तारीख टाकली गेल्याने फटका बसला. पुढील महिन्याची तारीख टाकल्याने सटवा नानाराव मस्के या उमेदवारावर भरती प्रक्रियेतून बाद होण्याचा प्रसंग ओढवला.
हिंगोली तालुक्यातील वऱ्हाडी येथील सटवा मस्के या उमेदवाराने पोलीस भरतीच्या दृष्टीने वर्षभरापासून सराव केला. तसेच लेखी परीक्षेचा अभ्यास करून भरतीची संपूर्ण तयारी केली. भरती प्रक्रियेसाठी त्याने नागपूर येथे अर्ज भरला. त्यासाठी एप्रिल महिन्यात कागदपत्रे जमा केली. परंतु त्याचे नाव १२ मेच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. परंतु प्रमाणपत्र देताना मात्र १५ जून ही तारीख नोंदविण्यात आली. मस्के भरतीसाठी गेल्यानंतर तेथे त्यांना मुदतीनंतर जातीचे प्रमाणपत्र काढल्याचे कारण दाखवत भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले.

Story img Loader