गोपीनाथ मुंडे उमेदवारी निश्चित करीत व कार्यकत्रे त्यांना निवडून आणत. त्याच धर्तीवर आमदार पंकजा मुंडे यांनी जिल्हय़ातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार निवडावेत, असा एकमुखी ठराव बठकीत संमत करण्यात आला. पंकजा मुंडे देतील, त्या उमेदवारास विजयी करण्याची जबाबदारी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वीकारल्याचे या वेळी सर्वानीच पक्ष निरीक्षकांना सांगितले. ‘मी राज्यभर फिरणार आहे. त्यामुळे ‘मुंडेसाहेबांचा जिल्हा, बीड जिल्हा’ ही घोषणा घराघरांत पोहोचवा,’ असे आवाहन पंकजा मुंडे यांनी या वेळी केले.
बीड तालुक्यातील कपिलधार येथे आमदार पंकजा मुंडे, भाजप निरीक्षक सुधाकर देशमुख, नानाभाऊ श्यामकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. जिल्हय़ातील ६ विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना व इच्छुकांना आपले मत व्यक्त करण्यास बैठकीत सांगण्यात आले, मात्र, उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना उमेदवार निश्चितीचे सर्वाधिकार देण्याची मागणी केली. आ. मुंडे ठरवतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केले. पक्ष निरीक्षक देशमुख यांनीही गोपीनाथ मुंडे राज्यभरात कार्यकत्रे उभे केले. अनेकांना आमदार-खासदार केले, सत्तेचा विश्वास निर्माण केला. त्यामुळे भाजपला आज चांगले दिवस आले आहेत. लोकांच्या इच्छेप्रमाणे पंकजा मुंडे यांना पक्ष संधी देईल, असेही त्यांनी सांगितले. आ. पंकजा मुंडे यांनीही दु:खातून सावरून आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन करण्यासाठी राज्यभर फिरणार असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा