वाई : साताऱ्यात १ नोव्हेंबरपासून १५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी १ कोटी २८ लाख टनाइतके ऊस गाळप होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील वर्षीपेक्षा ऊस गाळपात अंदाजे २९ लाख टनांइतकी वाढ होण्याची शक्यता साखर आयुक्तालयाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता कारखान्यांकडून व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, ऊस दरवाढीची शेतकरी संघटनांची मागणी, साखर आयुक्तालयाच्या अटी व शर्ती यांमुळे साताऱ्यातील यावर्षीचा गळीत हंगामाबाबत चर्चा होती. सद्या साखर कारखान्याची टोळीना क्षेत्र वाटप, शिवारातील ऊस तोड व रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी वाहने असे धांधलीचे चित्र आहे. अनेक कारखान्यांकडून गळीत हंगाम सुरू झाला आहे.

Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 
Same place for dry port and sugar company Meeting soon to resolve the dispute
शुष्क बंदर, साखर कंपनीसाठी एकच जागा; तिढा सोडविण्यासाठी लवकरच बैठक
Ambalika sugars factory awarded best in state for quality and efficiency
अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर
How much sugar will be exported from Maharashtra mumbai news
दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी; जाणून घ्या, महाराष्ट्रातून किती साखर निर्यात होणार
New decision regarding ethanol production from corn Mumbai news
सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या, मक्यापासून इथेनॉल निर्मिती बाबतचा नवा निर्णय

हेही वाचा – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी व्यवस्थापन, एनआरआय कोट्याचे कमाल शुल्क जाहीर

मागील वर्षी १५ कारखान्यांकडून ९९ लाख २३ हजार ८३७ टनाइतके ऊस गाळप होऊन एक कोटी सव्वीस लाख आठ हजार क्विंटल साखर निर्मिती झाली होती. त्या तुलनेत यावेळी ऊस उत्पादनात वाढ होऊन ते सुमारे सव्वाकोटी टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. ऊस गाळपात गतवर्षापेक्षा यंदाच्या हंगामामध्ये अंदाजे २९ लाख टनांइतकी वाढीची शक्यता साखर आयुक्तालयाकडून वर्तविण्यात आली आहे. या हंगामात उसाची वाढ अपेक्षित असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादनात घट होणार आहे. कारखान्यांची गाळपक्षमता वाढल्यामुळे हंगाम किमान शंभर दिवस चालेल असेच सध्याचे चित्र आहे.

यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ९ सहकारी आणि ८ खासगी कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. कारखान्यांनी बैठक घेऊन यंदाच्या ऊस उपलब्धतेची माहिती निश्चित करण्यात आली. कृषी विभागाकडूनही माहिती संकलित करून एकत्रित आकडेवारी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार चालू हंगामात कारखान्यांकडे असलेले आडसाली उसाचे क्षेत्र ३९ हजार ३२९ हेक्टर, पूर्वहंगामी लागवडीतील ऊस क्षेत्र २७ हजार ५०९ हेक्टर, सुरू लागवडीतील क्षेत्र सुमारे १६ हजार ५१५ हेक्टर तर खोडवा ऊसाखालील क्षेञ ३३ हजार ३५८ हेक्टर असे एकून १ लाख १६ हजार ७११ हेक्टर इतके क्षेत्र आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उसाची वाढ कमी झाली आहे. उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ऊस लागणीमध्ये वाढ झाली असली तरी उत्पादन दुष्काळी परिस्थितीमुळे घटणार आहे. यावर्षी साखर कारखान्याची उत्पादन क्षमता वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – “देशाला नोकऱ्या पुरवणारा महाराष्ट्र दुबळा केला जातोय, रोजगाराच्या संधी…”, ठाकरे गटाचा मोदी अन् शिंदे सरकारवर हल्लाबोल

चालू वर्षी ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने ऊस वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. सद्या भीषण पाणीटंचाई झाली आहे. या एकत्रित परिणामामुळे ऊसाच्या वजनात घट होऊन साखर उत्पादन घटणार आहे. त्यामुळे अपेक्षित ऊस गाळप व साखर उत्पादनासाठी हा हंगाम कसोटीचा ठरणार आहे. – जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना.

कृषी विभागाने पाडेगाव (ता खंडाळा) संशोधन केंद्राकडून यावर्षी उसाच्या उत्पादनात किती घट होणार याची माहिती मागवली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ऊस लागण वाढली असली तरी ऊस उत्पादनात घट होणार असल्याचे दिसत आहे. भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, सातारा.

Story img Loader