नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा टियागो गाडीतील प्रवासी सिन्नरकडून घोटीकडे जात होते. त्यावेळी घोरवड घाटामध्ये वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही कार थेट दीडशे ते दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : नाशिकमध्ये भाजीपाला पिकअप आणि लग्झरीत भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.