कासा : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक मालवाहू कंटेनर उलटून भीषण अपघात झाला आहे. कंटेनर उलटून आर्धा भाग पुलावरून खाली लोंबकळत राहिल्यामुळे यामध्ये वाहून नेण्यात येत असलेला माल पुलावरून खाली पडला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे आणि त्यामधील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
गुजरातकडून मुंबईकडे प्लॅस्टिकचा काच्चामाल घेऊन निघालेला कंटेनर चारोटी उड्डाणपुलावरून जात असताना उलटून अपघातग्रस्त झाला आहे. यामध्ये चालक, वाहक आणि दोन प्रवासी असल्याची माहिती देण्यात येत असून चौघांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तर वाहून नेण्यात येणार माल पुलावरून खाली पडल्यामुळे मालाचे आणि कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – धनंजय मुंडे होणार चेकमेट? बीडमधील सभेतून शरद पवार काय बोलणार?
हेही वाचा – तब्बल पाच दशकानंतर मान्सूनची एवढी लांब विश्रांती!
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. उड्डाणपुलावर तिसऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला असून अपघातामुळे एक मार्गिका बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहन उड्डाणपुलावरून बाजूला काढण्यास सुरुवात केली आहे.