करोनाच्या प्रतिबंधासाठी पुढील १५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आणि कसोटीचे असून, या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावीच लागेल. दहावी-बारावी वगळता अन्य परीक्षा लांबणीवर टाकण्याच्या आणि सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांवरील गर्दीला रोखण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर आज शिर्डीमधील साई संस्थानने दुपारी तीनपासून अनिश्चित काळासाठी मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिर्डीमधील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने भक्तांसाठी आज दुपारी तीन वाजल्यापासून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी कधी पर्यंत असेल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पुढील सुचना मिळेपर्यंत भक्तांना साईंचे दर्शन घेता येणार नाही असं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे.

सण-उत्सव, कार्यक्रमांना बंदी

राज्यात धार्मिक सण-उत्सव, समारंभांबरोबरच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा आणि धार्मिक विधीशिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. मंदिरे, मशिदी, चर्च अशा सर्वच प्रार्थनास्थळांमधील गर्दी टाळण्याची आवश्यकता असून, सर्व धर्मीय धर्मगुरूंनी त्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

सिद्धीविनायक मंदिर आणि तुळजाभवानी मंदिर ही बंद

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर बंद असताना नित्याचे धार्मिक विधी पूजाऱ्यांमार्फत केले जाणार असल्याची माहिती आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे प्रमुख आदेश बांदकेर यांनी दिली. सिद्धीविनायक मंदिरात अनेक भाविक वैद्यकीय मदतीसाठी येतात. तो मदत कक्ष सुरु राहणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजाभवानी मंदिरही ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहे.