मुरुड तालुक्यातील शिरगाव येथील वाळीत प्रकरणात अखेर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता. पीडित कृष्णा सातामकर यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून घराच्या व गोठय़ाच्या भोवती बांधकाम केले आहे. गावातील काही लोकांनी हे बांधकाम अतिक्रमण असल्याचे गावात सांगून त्यांच्याविरोधात ग्रामस्थांना चिथवले. यामुळे गावातील एकोप्याला बाधा आली असून गावकीने सातामकर यांच्याशी संबंध तोडले आहेत. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा