परवानगी नाकारलेली असतानाही गायनाचा कार्यक्रम केल्याने गायक सोनू निगमसह चौघांविरुद्ध नागपूरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
‘इनोव्हेशन सोल्युशन अँड इव्हेंट’ने नागपूरच्या सिव्हिल लाइन्समधील बिशप कॉटन स्कूलच्या मैदानावर सोनू निगम याच्या गायनाचा कार्यक्रम शनिवारी रात्री आयोजित केला होता. त्यासाठी त्यांनी गुरुवारी पोलिसांकडे अर्ज केला होता. कार्यक्रमाचा परिसर शांतता झोन असल्याने पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली. तरीही आयोजकांनी, तसेच गायक सोनू निगम याने कार्यक्रम केला. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजिका नीरजा धर्माधिकारी, बिशप कॉटन शाळेच्या मुख्याध्यापिका, गायक सोनू निगम, तसेच कार्यक्रमाशी संबंधित व्यक्तींविरोधात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ३७ व कलम १३५ अन्वये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा