विक्रमगड तालुक्यातील दावडे येथील अरविंद आश्रमशाळेमध्ये राहत असलेल्या विद्यार्थिनींच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विक्रमगड पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र भोये, अधिक्षिका रंजना नडगे आणि स्वयंपाकी बंडू राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांनी अजूनही कोणाला अटक केलेले नाही.
विक्रमगड तालुक्यातील अरविंद आश्रमशाळा दावडे येथे अक्षता कवटे ही सहावी इयत्तेमध्ये शिकणारी मुलगी राहत होती. महिन्याभरापूर्वी तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. वारंवार तक्रार करून देखील या प्रकरणी कोणत्याही प्रकराची कार्यवाही होत नसल्याने अखेर २३ डिसेंबरला आदिवासी एकता परिषदेने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या आंदोलनानंतर विक्रमगड पोलिसांनी आश्रमशाळेतील तिघांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

Story img Loader