राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील माजी आमदार व्ही. एन. पाटील यांच्यावर अखेर गुरूवारी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी व्ही. एन. पाटील यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून त्याच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी व्ही.एन. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विठ्ठल पाटील गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे वडील असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अखेर आज पाच दिवस उलटल्यानंतर मूर्तिजापूर पोलिसांनी विठ्ठल पाटील यांच्यावर ३२३ व ५४० या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, ही कारवाई पुरेशी नसल्याचे सांगत तक्रारदारांकडून नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात जाणुनबुजून संथगतीने तपास केल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असलेले गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील यांच्या संस्थेचे त्यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथे विद्यालय आहे. त्या गावापासून १२ कि.मी.अंतरावर असलेल्या मंगरूळकांबे येथे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहे. घुंगशी गावात विज्युक्‍टा संघटनेचे पदाधिकारी असलेले प्रा. संजय देशमुख यांचे भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन्ही संस्थांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून वाद सुरु आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मान्यतेवरून शिक्षण विभागाकडे व न्यायालयातही या संस्थांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांचे वडिल माजी आमदार व्ही. एन. पाटील यांनी काल संजय देशमुख यांच्या भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागातील आत्माराम राठोड हे अधिकारी उपस्थित होते. व्ही.एन. पाटील तपासणी करत असताना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय आठवले हे या सर्व  प्रकरणाचे चित्रिकरण करीत होते. त्यावर चित्रिकरण कशाला घेता असे म्हणत पाटील यांनी प्राचार्य व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने  व्ही. एन. पाटील यांनी अमोल काळे नामक कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली.

pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
anticipatory bail application of illegal school principal rejected by pune court
बेकायदा शाळेच्या मुख्याध्यापिकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Story img Loader