लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांच्या झालेल्या जाहीर सभेत दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याप्रकरणी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या विरूध्द अखेर जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Pannuns Sikhs for Justice is dangerous to India
खलिस्तानी अतिरेकी पन्नूनची ‘सिख्स फॉर जस्टीस’ संघटना भारतासाठी धोकादायक का आहे?
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Former Khanpur legislator Kunwar Pranav Singh Champion.
भाजपाच्या माजी आमदाराला अटक, अपक्ष आमदाराला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई

गेल्या १ मे रोजी कर्णिक नगरजवळ लिंगराज वल्याळ मैदानावर सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी देवेंद्र कोठे यांनाही भाषणाची संधी देण्यात आली होती. त्यांनी आपल्या भाषणात धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यापूर्वी सोलापुरात काँग्रेसचे नेतै राहुल गांधी यांच्या झालेल्या जाहीर सभेत त्यांनी केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास देशातील प्रत्येक महिलेला एक लाख रूपये देऊन लखपती बनविण्याचे आश्वासन दिले होते. तो मुद्दा पकडून देवेंद्र कोठे यांनी, एका हिंदू पत्नीसाठी एक लाख आणि मुस्लिमाच्या चार पत्नींना चार लाख मिळणार. म्हणजेच काँग्रेसचे मुस्लीमप्रेम जागे होणार आहे. हिंदुंनीही आता चार विवाह करावेत किंवा भाजपला मतदान करावे, असे वक्तव्य केले होते. त्याबद्दल मुश्ताक महिबूब शेख (रा. बेगमपेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पाठपुरावा केला होता. त्यानुसार पोलिसांनी देवेंद्र कोठे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-“उद्धव ठाकरे म्हणाले, मी यू टर्न घेतोय, शिवसैनिकांसमोर आमची आब्रू…”, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’वरील घटनाक्रम

देवेंद्र कोठे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे संपर्कप्रमुख म्हणून मोठे झालेले आणि शिंदे यांचे स्थानिक राजकारण पाहिलेले दिवंगत विष्णुपंत कोठे यांचे नातू आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे आहेत. सात वर्षांपूर्वी महेश कोठे हे काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी देवेंद्र कोठे हेसुध्दा सेनेत दाखल झाले होते. कोठे कुटुबीय सोलापूरच्या स्थानिक राजकारण वलयांकित मानले जाते. सोलापूर लोकसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच आक्षेपार्ह विधान केल्यामुळे ते वादग्रस्त ठरले आहेत. दरम्यान,कोठे यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला आहे. त्यावर कारवाई प्रलंबित आहे.

Story img Loader