लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग: ठाकरे आणि वायकर कुटुंबियांच्या नावे असलेल्या कथित १९ बंगले घोटाळा प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या कोर्लई ग्रामपंचायतीच्या आजी माजी सरपंच आणि ग्रामसेवकांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुडच्या गट विकास अधिकाऱ्यांनी १३ जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. गेल्या दोन महिन्यात ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे

ganja ulhasnagar court case
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Image Of Yogesh Kadam
Raj Thackeray : “मनसेने मते खाल्ल्यामुळे आमचे १० उमेदवार पडले”, राज ठाकरेंच्या पक्षावर शिंदे गटाच्या मंत्र्याचा आरोप

अनियमितता आणि दिशाभूल करणाऱ्या खोट्या नोंदी करणाऱ्या आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी जबाबदार असणाऱ्या १३ जणांविरोधात भादवी कलम ४२०. ४६५, ४६६, ४६८, २०४, १६६, १६७स २१८ आणि ३४ अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या प्राधिकारपत्रानुसार मुरुडच्या गट विकास अधिकारी संगीता भिंगारे यांनी याबाबतची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक देविदास मुपडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आणखी वाचा-आता कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे विभागाचा कार्यभार देणे बंद होणार

ठाकरे आणि वायकर यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण आणि गावठाणा बाहेरील नियमबाह्य आणि अनधिकृत बांधकामांची चौकशी सुरू केली होती. यात २००५ ते २०२२ या कालावधीत गावठाणा बाहेर २६३ तर गावठाणात ६३ बांधकामे झाल्याचे चौकशी दरम्यान समोर आहे. यात ग्रामपंचायतीने गावठाणाबाहेर नियमबाह्य बांधकाम परवाने आणि दुरुस्ती परवाने दिले गेले. तसेच काही बांधकामांना कागदपत्रांची पूर्तता न करताच परवानगी दिली गेली. मिळकत नोंद वहीत नोंदी करतांना अनेक त्रूटी समोर आल्या. काही मिळकती अस्तित्वात नसूनही त्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या. मासिक सभांची अनेक इतवृत्त रजिस्टर आढळून आली नाहीत. बांधकाम परवानगी बाबत तसेच दुरुस्तीबाबतची अनेक कागदपत्रे आढळून आली नाहीत.

ही बाब लक्षात घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी २००५ ते २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतीवर कार्यरत असणाऱ्या सरपंच आणि ग्रामससेवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्मामुळे ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच आणि आजी माजी ग्रामसेवक पोलीस तपासाच्या रडारवर येणार आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामंपचायतीच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर या चौकशीला सुरुवात झाली होती..

Story img Loader