अलिबाग : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray : “हात लावेन तिथे सत्यानाश असा मोदींचा नवा सिनेमा..” , दादा कोंडकेंचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंचा टोला

Sessions Court observation while denying bail to driver Sanjay More in Kurla BEST bus accident case Mumbai news
आरोपीच्या निष्काळजीपणामुळेच ‘बेस्ट’ अपघात; चालक संजय मोरे याला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश

महामार्गाचे निकृष्ठ काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक  हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर  अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी  तक्रारी केली होती. त्यानुसार  माणगाव पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकी करणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहिन काम केले.

हेही वाचा >>> महायुतीला धक्का देत ‘एकला चलोरे’चा नारा; महादेव जानकरांची २८८ मतदारसंघात…

दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले.  काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हे काम केले नाही.  त्यामुळे या महामार्गावर  अपघात होऊन होऊ लागले. २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले.  त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले.  त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक  सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार  करीत आहेत.

Story img Loader