मालवण राजकोट किल्ल्यावर काल बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी राणे समर्थक, ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केले आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणी दरम्यान काल बुधवारी दुपारी राणे समर्थक व ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Sushma Andhare: नितेश राणे-जयदीप आपटे यांच्या संबंधामुळेच मालवणमधील पुतळ्याचे काम दिले गेले, सुषमा अंधारे यांचा आरोप

यात संभाजी पाटील, मेहेक परब हे पोलीस कर्मचारीही जखमी झाले.त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले. त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत.