सोलापूर : एका प्रतिष्ठित घराण्यातून वडिलोपार्जित वारसा हक्काने तीन मुलींना मिळालेल्या कोट्यवधी रूपये किंमतीच्या १३ हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर खोट्या आणि बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर भूखंड तयार केले आणि जमिनीचा स्वतः मालक असल्याचे भासवून ५० ते ६० व्यक्तींना भूखंडांची विक्री करून मूळ जमीनमालकांसह भूखंड खरेदी  केलेल्या व्यक्तींची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते, भाजपचे माजी नगरसेवक श्रीनिवास आशप्पा करली यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटकेनंतर तीन दिवसांची पोलीस कोठडीही मिळाली आहे. हा फसवणूकीचा प्रकार सोलापूर शहरातील मजरेवाडीत घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “…तेव्हा मी अमेरिकेत जाऊन बसणार”, बच्चू कडूंचं मोठं विधान

प्रतिष्ठित थोबडे घराण्यातील दिवंगत ज्येष्ठ फौजदारी वकील शिवशंकर धर्मराव तथा एस. डी. थोबडे यांच्या वकिली पेशात असलेल्या कन्या सुप्रिया राजेंद्र नेर्ली (वय ५४, रा. बेळगाव, कर्नाटक) यांनी यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिवंगत शिवशंकर थोबडे यांच्या वडिलोपार्जित मालकीची १३ हेक्टर १३ आर क्षेत्र जमीन शहर हद्दवाढ भागात मजरेवाडीत होती. कोट्यवधी रूपयांची ही मिळकत थोबडे यांच्या निधनानंतर सुप्रिया नेर्ली यांच्यासह तीन मुलींना वारसाहक्काने मिळाली होती. सुप्रिया यांची एक बहीण हैदराबादला तर दुसरी बहीण बंगळुरूत राहते. सुप्रिया नेर्ली अधुनमधून सोलापुरात येऊन आपल्या मालकीच्या जमिनीची पाहणी करीत असत.

हेही वाचा >>> Video :”मला घरी बसायला खूप आवडतं, किंबहुना..”, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसेने अशी उडवली खिल्ली

एकेदिवशी त्यांनी मजरेवाडीत येऊन आपल्या मालकीच्या जागेची पाहणी केली असता तेथे अनेक पक्की बांधकामे झाल्याचे आणि पत्राशेड उभारल्याचे दिसून आले. त्यासंदर्भात संबंधित व्यक्तींकडे विचारणा केली असता भाजपचे माजी नगरसेवक श्रीनिवास करली (रा. श्रमजीवीनगर, मजरेवाडी) यांनी या जागेचे नरसिंह नगर असे नामकरण करून ही संपूर्ण संपूर्ण जागा आपल्याच मालकीची असल्याची खोटी आणि बनावट कागदपत्रे दाखवून खरेदी करारासह जागेचा ताबा दिल्याची माहिती समोर आली. यात खोटी कागदपत्रे तयार करून आणि ती खरी असल्याचे भासवून श्रीनिवास करली यांनी जागेची बेकायदेशीर विक्री करून सुप्रिया नेर्ली यांच्यासह भूखंड खरेदी केलेल्या ५०-६० व्यक्तींची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against former bjp corporator for grabbing lands of daughters of prominent families zws
Show comments