रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभेचे उमेदवार विद्यमान आमदार उदय सामंत यांच्या विरोधात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मयुरेश पाटील रा. मिरजोळे याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार माजी नगरसेवक नीमेश नायर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम २२३, १७५, ३६६ (२), लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कायदा कलमचे कलम १२३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीमध्ये मयुरेश पाटील, रा. मिरजोळे ता. जि. रत्नागिरी याने १९ नोव्हेंबर २०२४ मध्ये सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नीमेश नायर मारुती मंदीर येथील शिवसेना कार्यालय रत्नागिरी येथे असताना फिर्यादी यांनी मोबाईल नंबर ९४०५६७८८७८ वरुन तीन ऑडिओ व्हिडिओ क्लिप पाठवल्या. त्यामध्ये भगवी रत्नागिरी हिरवी कोणामुळे झाली. ही ऑडिओ व्हिडिओ क्लिप प्रसारित केली.
त्यामध्ये भगवी रत्नागिरी हिरवी कोणामुळे झाली? वीस वर्षापासून अनधिकृत अतिक्रमणाला वरदहस्त कुणाचा? लोकमान्य टिळक वाचनालयाच्या जागेवर अतिक्रमणाला कुणाचा पाठिंबा? अनधिकृत मजारींना कुणाचे संरक्षण? उदय सामंताच्या निष्क्रियतेची वीस वर्ष आता परिवर्तन अटळ अशा प्रकारच्या तीन क्लिप प्रसारित केल्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांची अशा प्रकारे बदनामी मयुरेश पाटील याने बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारी नुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोउनि पवन कांबळे हे करीत आहेत.